जळगावात खूनातील आरोपीला पकडणार्‍या सुपर कॉप रमेश चौधरींचा पोलिस अधीक्षकांकडून गौरव


In Jalgaon, Super Cop Ramesh Chaudhary, who apprehended the murder suspect, was honored by the Superintendent of Police जळगाव (13 जानेवारी 2026) : प्रेम प्रकरणाच्या वादातून गोलाणी मार्केटमध्ये बुधवार, 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता साई गणेश बोराडे (18, रा. शंकरराव नगर, जळगाव) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. याचवेळी गोलाणी मार्केटमध्ये कामानिमित्त आलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यातील हवालदार रमेश चौधरी यांनी धाडस करीत आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (25, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. कर्तव्याप्रती निष्ठा जोपासत गुन्हा करणार्‍या आरोपीला पकडून देणार्‍या हवालदार रमेश चौधरी यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव केला.

हवालदाराची सतर्कता मात्र जखमीची मावळली प्राणज्योत
चाकू हल्ला होत असताना गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलच्या कामानिमित्त आलेले एमआयडीसीचे हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे घटनास्थळी धावले. त्यांनी संशयित शुभम सोनवणे याला धरले आणि साई बोराडे याच्यावर आणखी वार होण्यापासून वाचवले. तत्काळ शुभम सोनवणे याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात शस्त्रासह दिले तसेच जखमीला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय बाहेर दिल्यावर रुग्णालयात उपचारासाठी हलवले व प्रथमोपचार केल्यानंतर साई बोराडे याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र सायंकाळी उशिरा त्याची प्राणज्योत मालवली होती.

हवालदार चौधरींचा पोलिस अधीक्षकांकडून गौरव
हल्ला होत असताना आरोपीला हल्ला करण्यापासून रोखल्याने तसेच आरोपीला ताब्यात घेवून शहर पोलिसांच्या ताब्यात देणार्‍या एमआयडीसी पोलिस ठाण्यातील रमेश चौधरी यांचा सोमवार, 12 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सहृदय गौरव करीत त्यांना प्रशंसा पत्र दिले व भविष्यातही उत्कृष्ट कार्याची अपेक्षा व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !