अजितदादांचा फडणवीसांना टोला : बरे झाले मला बाजीराव म्हटले मात्र तिजोरीत खडखडाट भाजपामुळेच झाला !


पुणे (14 जानेवारी 2026) : महापालिका फक्त उत्पन्न मिळविण्यासाठी नव्हे, तर ती नागरिकांना सेवा देण्यासाठी, लोकाभिमुख कारभार करण्यासाठी असते, असे सांगतानाच मला बाजीराव म्हटल्याबद्दल आनंद वाटला आणि खिशात नाही आणा, असे बोलून मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या तिजोरीत भाजपमुळे पैसा शिल्लक राहीला नसल्याचे मान्य केले. आमच्या मनगटात जोर आहे. तिजोरीत आणा आणू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या टिकेला उत्तर दिले. घड्याळाच्या चिन्हापुढील बटण दाबून धोक्याचा अलार्म बंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जनतेची आम्हाला निश्चितपणे काळजी
अजित पवार म्हणाले की, मोफत मेट्रो, बस प्रवासाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. तर सखोल विचार करून, तज्ज्ञांचा सल्ला, राजकीय धैर्य व जनतेबद्दलच्या काळजीतुन घेतलेला आहे. पुण्याची वाहतुकीची परिस्थिती पाहील्यानंतर मन हेलावून जाते. रोज तास न् तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकतात. सध्या रोज 30 हजार नागरिक मेट्रोचा वापर करतात तर रस्त्यांवर गर्दी कायम आहे. मेट्रोचा वापर कमी होतो. म्हणून स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला नको का ? तुम्हाला लवकर घरी पोहोचायचे नाही का ? चांगले रस्ते व ताण तणावमुक्त जीवन आपल्याला नको का ? यासाठी धाडसी व ठोस निर्णय घ्यावे लागतात.

महापालिका निवडणुकीत आम्ही दिलेली आश्वासने हे उपकार नाहीत किंवा दानधर्म नाही. ही निवडणुकीपुरती दिलेली आश्वासने नाहीत. आमचा जाहीरनामा पैसा उधळण्यासाठी नाही, लोकांनी भरलेला कर त्यांना योग्य स्वरुपात परत मिळावा, हा त्यामागील उद्देश आहे.

पुणेकरांनी घड्याळाचा अलार्म ऐकुन घड्याळाच्या चिन्हा पुढील बटण दाबून धोक्याचा अलार्म बंद करावा. आमच्या मनगटात जोर आहे त्यामुळे आम्ही हे करू. बस आणि मेट्रोचा प्रवास हा निर्णय घिसाडघाईने घेतलेला नाही. या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करूनच ही योजना जाहीर केली आहे. जे लोकांना हवे आहे. ते आम्ही देणार आहोत. याकरीता केवळ अंदाजपत्रकाच्या दोन टक्के इतकीच रक्कम खर्ची पडणार आहे. काही लोकांना राजकीय नियंत्रण गमविण्याची भीती वाटते. पुणे आणि पिंपरी चिचंवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल असे अजित पवार यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !