यावलमधील बालाकाचे अपहरण प्रकरण : मुख्य संशयीताला अटक
Yawal child abduction case: The main suspect has been arrested यावल (14 जानेवारी 2026) : यावल शहरातील महाजन गल्लीत आत्याच्या घरी आलेल्या एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण करणार्या मुख्य संशयीतास पोलिसांनी अटक केली. या बालकाचे अपहरण त्यांच्या काकाच्या मदतीने करण्यात आले होते तर पोलिसांनी ज्या दुचाकीवर अपहरण झाले ती दुचाकी ताब्यात घेतली असून संशयीतास यावल न्यायालयाने मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
काय घडले यावल शहरात ?
यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी प्रमोद तळेले यांच्या घरी डिंडोली, सुरत येथुन आलेल्या नरेंद्र विलास बेंडाळे यांचा सहा वर्षीय मुलगा आदित्य नरेंद्र बेंडाळे याचे गेल्या शुक्रवारी अपहरण करण्यात आले होते. दरम्यान त्यास त्याच रात्री म्हसावद, ता.जळगाव येथूल पोलिसांनी ताब्यात घेत सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. तर या गुन्ह्यात बालकाच्या चुलत काका वैभव घनश्याम बेंडाळे (50, रा.सम्राट कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आलीव गुन्ह्यातील मुख्य संशयीत व मुलास दुचाकीव्दारेे शहरातून नेणारा सचिन गुरुदास पाटील- माळी (रा.सम्राट कॉलनी, जळगाव) यासदेखील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. संशयीतास मंगळवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांनी 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली. संशयीताची रवानगी भूसावळ येथील अतिरिक्त जिल्हा कारागृहात करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.


