भुसावळात चायनीज विक्रेत्या महिलेकडे आढळला गावठी कट्टा

महिलेकडे कट्टा आढळल्याची इतिहासातील प्रथमच घटना


A country-made pistol was found with a Chinese food vendor woman in Bhusawal भुसावळ (13 जानेवारी 2026) : भुसावळ शहरात चायनीज विक्री करणार्‍या 35 वर्षीय महिलेकडे गावठी कट्टा आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवार, 14 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयासमोर ही कारर्वा शहर पोलिसांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत या महिलेची चौकशी सुरू होती व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना न्यायालयासमोर आलेल्या एका महिलेच्या दुचाकीत गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. पोलिस कर्मचारी राहुल बेनीवाल व दीपक शेवरे आदींनी घटनास्थळी जात महिलेच्या स्कुटीची डिक्की तपासली असता त्यात गावठी बनावटीचा कट्टा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तसेच महिलेला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला महिलेने उडवा-उडवीची उत्तरे दिली मात्र सायंकाळपर्यंत महिलेची पोलिसांकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील महिलेचा चायनीज विक्रीचा व्यवसाय असून तिने हा कट्टा का व कुणाकडून आणला? याबाबतची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

महिलेकडे कट्टा आढळल्याची प्रथमच घटना
शहरात आतापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या गुन्हेगारांकडे गावठी कट्टा आढळल्याचे प्रकार समोर आले आहेत मात्र प्रथमच व्यवसाय करणार्‍या महिलेकडे गावठी कट्टा आढळल्याने या बाबीला विशेष महत्व आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !