भुसावळात कोरोनामुक्त झालेल्या नागरीकाचे फुलांची उधळण करून स्वागत


भुसावळ : कोरोनावर मात केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 21 जणांना प्रशासनाने डिस्चार्ज दिला तर रविवारी सायंकाळी हे लोक आपापल्या घरी परतले. शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीतील 40 वर्षीय नागरीकही रात्री साडेनऊ वाजता आपल्या कॉलनीत परतल्यानंतर नागरीकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या व डमरू तसेच थाळ्या वाजवून तसेच फुलांची उधळण करून या नागरीकाचा उत्साह वाढवला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रकाश बत्रा, राजकुमार वाधवाणी, सुरेश अंबाणी, नवीन कुकरेजा, सनी दर्डा, उमेश हसरानी तसेच सिंधी कॉलनीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !