लग्नाच्या आमिषातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
A minor girl was sexually assaulted under the pretext of marriage भडगाव (15 जानेवारी 2026) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार भडगाव तालुक्यात घडला. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे प्रकरण
भडगाव तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय पीडीता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. एक वर्षापूर्वी पीडीता घरात एकटी असतांना संशयित वाल्मीक दिलीप शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरीने अत्याचार केला तसेच ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझ्या परिवाराला जीवेठार मारेल, अशी धमकी दिली. याच धमकीच्या आधारे पीडीत मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा प्रकार सहन न झाल्याने पीडीत मुलीने आपल्या पालकांना घटना सांगितली. त्यानुसार तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी वाल्मिक शिरसाठ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत.


