पाचोर्‍यात धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले


In Pachora, a woman’s mangalsutra was snatched in a ‘Dhoom’ style robbery पाचोरा (15 जानेवारी 2026) : पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्ली परिसरात सायंकाळच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रासह पोत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी धूम धूम स्टाईल लांबवली. एक लाख 57 हजारांचा सोन्याचा ऐवज लांबवण्यात आला.

अशी घडली घटना
कोडवाडा गल्लीतील रहिवासी वंदना नंदकिशोर कोतकर (48) या 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही कामासाठी घराबाहेर निघाल्या होत्या. त्या रस्त्यावरून जात असताना अचानक एका दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने वंदना यांच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जोरात हिसकावत पळ काढला.

यावेळी वंदना यांनी आरडाओरड केली मात्र अंधाराचा फायदा घेत भामटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. या घटनेमुळे धक्का बसलेल्या वंदना यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाख 57 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !