जळगाव महापालिका निवडणूक प्रभाग 7 मधून चंद्रशेखर अत्तरदे विजयी
जळगाव (16 जानेवारी 2026) : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार, 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू झाली आहे. सुरुवातीच्या फेर्यांपासूनच महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) आपला वरचष्मा कायम राखला आहे. प्रभाग सातमधून भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी विजय मिळवला आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
महायुतीची विजयाकडे वाटचाल
महायुतीची विजयाकडे झेप जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी 12 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 63 जागांच्या मतमोजणीत महायुतीने बहुमताचा आकडा गाठण्याच्या दिशेने वेगाने झेप घेतली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वयामुळे अनेक प्रभागांत विरोधकांचे पानिपत होताना दिसत आहे.

केंद्राबाहेर विजयाचा गुलाल
कुसुंबा येथील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्राबाहेर जसे जसे निकाल हाती येत आहेत तसा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि कोण आला रे कोण आला, महायुतीचा वाघ आला अशा घोषणा देत कार्यकर्ते विजयी उमेदवारांचे स्वागत करत आहेत. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

