मुंबईत मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला !
दोघांचे राजकारण फक्त मुंबई-ठाण्यापुरतेच मर्यादित : प्रताप सरनाईकांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
The torch has been extinguished in Mumbai, and the engine has run out of smoke! मुंबई (16 जानेवारी 2026) : मशालीची ज्योत विझली असून मनसेच्या इंजिनचा धूरही संपल्याची टीका ठाकरे बंधूंना लक्ष्य करीत शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
रणनितीवर चढवला हल्ला
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करताना प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक रणनीतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यात निवडणुकीचा एवढा मोठा रणसंग्राम सुरू असताना ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचाराचे सोपस्कार पूर्ण केले. त्यांचे राजकारण केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. महाराष्ट्रात या दोन शहरांव्यतिरिक्त इतर 27 महापालिका आहेत, पण ठाकरे बंधूंनी उर्वरित महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे वार्यावर सोडले होते.

अखेरचे तीन दिवस देखावा
प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंनी प्रचारात दाखवलेल्या ’गांभीर्या’वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, केवळ शेवटचे तीन दिवस प्रचाराचा दिखावा करून आपण संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकतो, या भ्रमात ठाकरे बंधू होते मात्र आजच्या निकालातून त्यांचे हे स्वप्न भंग पावेल. ज्यांना उर्वरित महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना जनता स्वीकारणार नाही. मशालीची ज्योत आणि इंजिनचा धूर आता इतिहासजमा झाला आहे.

