मुंबईत इतिहास घडणार : भारतीय जनता पार्टीचाच ‘मराठी’ महापौर होणार !


मुंबई (16 जानेवारी 2026) :  मुंबईच्या इतिहासत पहिल्यांदाच भाजपाचा मराठी महापौर होत आहे. याबद्दल कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलत होते. मुंबईमध्ये कदाचित इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होऊ शकतो… असे विचारले असता, त्यांनी हे भाष्य केले.

उपाध्ये म्हणाले, ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकीचे निकाल आले आहेत. यावरून कुणालाही हे कळेल की, मुंबईमध्ये भारतीय जनचा पक्षाचा उमेदवार होईल. मी सांगतोय, मराठीच महापौर.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यंचे गेल्या एक वर्षांपासूनचे स्वप्न होते, गेल्या 40 वर्षांपासून आम्ही एक छोटा भाऊ म्हणून आमची सुरुवात झाली आणि आज आम्ही एवढ्या मोठ्या ठिकाणी आलो आहोत. आज एवढं मोठं यश भारतीय जनता पार्टीला मिळत आहे. पार्टी 100 वर जात असल्याने महायुतीत चर्चा होईल पण जे मुंबईत भारतीय जनता पार्टीचा महापौर, हे जे स्वप्न आम्ही बघितलं होतं, ते स्वप्न पूर्ण होण्यास आता काही अंतर बाकी आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !