धुळ्यात ईव्हीएम फोडल्याने गोंधळ : कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्या सहाय्यक निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
गणेश वाघ
धुळे (16 जानेवारी 2026) : धुळ्यातील मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर गुरुवार, 15 रोजी दुपारी निवडणूक सुरू असतानाच ईव्हीएमची तोडफोड झाल्याने तणाव निर्माण झाला होता शिवाय काही काळ मतदान न प्रक्रिया लांबली होती. याबाबत धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल. कर्तव्यावर असताना जवाबदार पद्धत्तीने परिस्थिती न हाताळल्याने व बळाचा वापर न केल्याने धुळे शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांना धुळे जिल्हा पोलिस धीकांत धीवरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीत दोन वर्ष पगारवाढ का थांबवू नये? अशी विचारणाही करण्यात आली आहे.
काय घडले धुळ्यात ?
धुळे महापालिकेसाठी गुरुवार, 15 रोजी निवडणूक झाली. गुरुवारी दुपारी निवडणूक सुरू असताना धुळे शहरातील मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर काहींनी वाद घालत ईव्हीएम मशीनची तोडफोड केली होती. यावेळी उमेदवार सतीश महाले यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी करत मतदान केंद्रात ठिय्या मांडला होता.

पोलिस अधिकार्यांची धाव
धुळे अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे, एलसीबी वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार आणि शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी दाखल होत महाले यांची समजूत काढली व त्यानंतर आमदार मंजुळा गावीत आणि डॉ.तुळशीराम गावीत यांनीही केंद्राला भेट देऊन माहिती घेतली होती.
साडेपाचपर्यंत मतदान : अज्ञातांविरोधात गुन्हा
मतदान केंद्रप्रमुखांनी ध्वनिक्षेपकावरून घोषणा करीत झालेल्या विलंबाची भरपाईसाठी साडेपाच वाजेपर्यंतची वेळ पाळली जाईल, असे मतदारांना आश्वस्त केले हाते. ईव्हीएमच्या तोडफोड प्रकरणी बूध अधिकारी अरुण भामरे यांच्या तक्रारीनुसार सात ते आठ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अधिक तपासार्थ शाळेच्या आवारातील काही सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज पुरावा म्हणून ताब्यात घेतले होते.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
मतदान केंद्रावर संशयीतांनी अनधिकृतपणे शिरून ईव्हीएमची तोडफोड झाल्यानंतर जनभावना संतप्त झाल्या होत्या तर निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांनी जवाबदार पद्धत्तीने परिस्थिती न हाताळल्याने व योग्य वेळी बळाचा वापर न केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मोहिते यांना शुक्रवार, 16 रोजी दोन वर्ष आपला पगारवाढ का थांबवू नये? या संदर्भात नोटीस बजावल्याचे अधीक्षकांनी कळवले आहे.

