तेढ निर्माण करणार्यांना निकालातून उत्तर : प्रवीण दरेकर ; भाजपने मानले उत्तर भारतीयांचे आभार
मुंबई (16 जानेवारी 2026) : मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न झाला मात्र मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिले. इथे सारे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दाखवून दिल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर लगावला. भाजप मुंबई तोडणार नाही, तर ती जोडणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजयी झाले.
प्रचंड आनंद देणारा विजय
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम आणि देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा असणारा विश्वास हा या ठिकाणी दिसला त्यामुळे हा विजय आम्हाला प्रचंड आनंद देणारा आहे.

उत्तर भारतीयही गुण्या-गोविंदाने नांदतायेत
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ’हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. खरे म्हणजे मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिलं उत्तर भारतीय सुद्धा आमच्यासोबत इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उत्तर भारतीयांनी दाखवलं या मातीनं आम्हाला मोठें केले आहे. या मातीचा सन्मान केला पाहिजे.म्हणून ते ही आमच्याबरोबर आहेत.

