जागतिक गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत वेदांतिका शुक्लला सुवर्णपदक
भुसावळ (16 जानेवारी 2026) : जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा 2025-2026 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्या फर्स्ट लेव्हलमध्ये वेदांतिका अनुप शुक्ल ही सुवर्णपदक मिळवून लेव्हल दोनसाठी पात्र ठरल्याचे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले.
वेदांतिका ही भुसावळ येथील प्र.ह.दलाल सरांची नात तर अमृता व अनुप शुक्लांची सुकन्या आहे. तिच्या ह्या नेत्रदीपक यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिला गणिताची विशेष आवड असून पुढे ह्याच विषयात उच्च पदवी मिळवण्याचं आपलं ध्येय असल्याचे ती म्हणाले. वेदांतिका ही नवी मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.


