महापालिका निवडणुकीत भाजपाचा राज्यात डंका : भुसावळात भाजपेयींचा जल्लोष

मंत्री संजय सावकारे म्हणाले ; जनतेचे विकासाला मत ; आगामी निवडणुकीतही भाजपाच विजयी होणार


BJP triumphs in the municipal elections across the state: BJP workers celebrate in Bhusawal भुसावळ (16 जानेवारी 2026) : राज्यभरातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा-महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यानंतर भुसावळातील भाजपेयींनी आनंदोत्सव साजरा करीत भाजपा कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी भाजपा पदाधिकार्‍यांनी विजयाच्या घोषणा देत एकमेकांना लाडू भरवले.

भाजपा पदाधिकार्‍यांचा जल्लोष
भुसावळातील मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शुक्रवारी दुपारी मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी एकत्र जमले व राज्यात भाजपा-महायुतीने दोन महापालिका वगळता मिळवलेल्या सर्वच जागांवरील विजयाचा व भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात आल्याचा जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पदाधिकार्‍यांनी लाडू भरवले.

यांची होती उपस्थिती
यावेळी मंत्री संजय सावकारे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, गटनेता युवराज लोणारी, शहराध्यक्ष किरण कोलते, सतीश सपकाळे, निकी बत्रा, देवा वाणी, पुरूषोत्तम नारखेडे, रुपेश देशमुख, अमोल महाजन, बाळा सोनवणे, प्रशांत नरवाडे, राजू खरारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुकीतही भाजपाला यश : मंत्री सावकारे
महापालिका निवडणुकीत मतदारांनी विकासाला पर्याय म्हणून भाजपाला मतदान केले. या निवडणुकीत राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. दोन महापालिका सोडल्या तर सर्वदूर भाजपा व महायुतीचे वर्चस्व असल्याचे आम्हाला आनंद आहे. जनतेचे मत हे विकासाला असून हे
देवेंद्रजींचे यश आहे. आगामी निवडणुकांमध्ये निश्चितपणे भाजपाच विजयी होईल, असा विश्वास मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !