अंतर्नादची आजपासून तीन दिवस पुष्पांजली प्रबोधनमाला

माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन ः प्रथम पुष्प शैलेश पाटील, द्वितीय प्रा. डॉ. संदीप धापसे, तर तृतीय बबनराव काकडे गुंफणार


भुसावळ (15 जानेवारी 2026) : माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुष्पांजली प्रबोधनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात यावल, रावेर तालुक्यातील विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये हे व्याख्यान होणार आहेत. यंदा व्याख्यानमालेचे आठवे वर्ष आहे.

प्रबोधनमालेचे प्रथम पुष्प शनिवार, 17 जानेवारीला सकाळी 9:45 वाजता न्यू इंग्लिश स्कुल व ज्यू कॉलेज, भालोद, ता.यावल येथे होणार असून भुसावळ येथील शैलेश पाटील हे गुंफतील. ‘शिक्षण म्हणजे काय ?’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ते अधिव्याख्याता म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे कार्यरत आहेत. शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे शिक्षक मार्गदर्शन व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

द्वितीय पुष्प 19 जानेवारी दुपारी 2:00 वाजता सौ. कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कुल व ज्यू कॉलेज, रावेर येथे होणार असून प्रा. डॉ. संदीप धापसे हे गुंफतील. स्पर्धा परीक्षा व करीयरच्या संधी या विषयावर ते व्याख्यान देतील. उपप्राचार्य म्हणून श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर येथे कार्यरत आहे. पदवी स्तरावर 18 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा तसेच कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

तृतीय पुष्प 21 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वाजता भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी, ता. यावल. येथे बबनराव काकडे ‘व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा’ या विषयावर पुष्प गुंफतील. ते सध्या फैजपूर येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहे. प्रशासन, महसूल व कायदेविषयक क्षेत्रातील दीर्घ अनुभवाच्या जोरावर प्रभावी वक्ते व मार्गदर्शक म्हणून सुद्धा ते परिचित आहे . राज्यभरातील विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांना सातत्याने ते मार्गदर्शन करतात. ‘रंग जीवनाचे’ या ललित लेखसंग्रहाचे ते लेखक आहेत.

अशा तिनही वक्त्यांची व्याख्याने बोचर्‍या थंडीत ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. रावेर विधानसभेचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन, जळगावचे उद्योजक अजय बढे यांच्या मार्गदर्शनात ही प्रबोधनमाला होत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून ज्ञानेश्वर घुले, समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी, सहसमन्वयक ललित महाजन आहेत. रसिकांनीही लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष
दरवर्षी ही प्रबोधनमाला भुसावळ शहर व परिसरातील शाळांमध्ये फिरत्या स्वरूपात राबवली जाते. विद्यार्थ्यांची अभिरुची टिकून राहावी, त्यांच्यात सकारात्मक व चांगल्या विचारांची रुजवणूक व्हावी, स्पर्धा परीक्षांविषयी आवश्यक माहिती मिळावी तसेच अधिकार्‍यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यंदा ही प्रबोधनमाला शाळांसह महाविद्यालयांमध्येही आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी दिली.

आजपर्यंत यांची झाली व्याख्याने
चांदवडचे विष्णू थोरे, नाशिकचे प्रमोद अंबडकर, एरंडोलचे प्रा. वा.ना.आंधळे, चाळीसगावचे मनोहर आंधळे, धरणगावचे डॉ. संजीवकुमार सोनवणे, वाशिमच्या उज्ज्वला मोरे, भुसावळचे जीवन महाजन, पुण्याचे देवा झिंजाड, अमरावतीचे नितीन देशमुख, सोलापूरचे नितीन चंदनशिवे, जळगावचे मनोज गोविंदवार, पाचोर्‍याचे रवींद्र पाटील, नागपूरच्या प्रा.विजया मारोतकर, अकोला येथील अनंत राऊत, जळगावचे ज्ञानेश्वर शेंडे, महेश गोरडे, सावद्याचे प्रा.व.पु.होले, जळगावचे दीपक पाटील, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ.जयदीप पाटील अशा अनेक दिग्गज वक्त्यांची व्याख्याने या प्रबोधनमालेत आजपर्यंत झाली आहेत.

नियोजन समिती
डॉ. संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, प्रसन्न बोरोले, शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, समाधान जाधव, भूषण झोपे,अमित चौधरी, डॉ. प्रा.श्यामकुमार दुसाने, हितेंद्र नेमाडे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे ,ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, कपिल धांडे, शिरीष कोल्हे, केतन महाजन, उमेश फिरके, विपीन वारके, मंगेश भावे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, योगेश साळुंके आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !