भुसावळात आरोपीला अटक करताना पोलिसांवर जमावाचा हल्ला : विटांसह काठ्यांचा मारा

हल्ल्यात पोलिस जखमी : 12 संशयीतांविरोधात गुन्हा : एका संशयीताला पकडण्यात यश


In Bhusawal, a mob attacked the police while they were arresting an accused : they were attacked with bricks and sticks भुसावळ (17 जानेवारी 2026) : मध्यप्रदेशातील पोलिसांसह स्थानिक पोलिस भुसावळातील इराणी संशयीताला पकडण्यास गेल्यानंतर त्यांच्यावर विटांसह काठ्यांचा मारा करीत हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना मुस्लीम कॉलनी परिसरात गुरूवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी 12 संशयीतांसह अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

काय घडले भुसावळात ?
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील (बडोदा, जि.आगरमालवा) येथील पोलिस संशयित करार अली हुजूर अली याला अटक करण्यात आले असता त्यांनी बाजारपेठ पोलिसांनी मदत घेतली. संशयीत हा मुस्लीम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 15 जानेवारी रोजी रात्री 10.30 ते 10.45 च्या सुमारास बाजारपेठ पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. मात्र, यावेळी संशयीताच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांचा रस्ता अडवला. संशयीताला नेऊ देणार नाही, असे म्हणत जमावाने पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

आरोपीला पकडताना जमावाचा पोलिसांवर हल्ला
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संयम ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र जमावातील काहींनी अचानक लाकडी दांडके, काठ्या आणि विटांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांवर हल्ला करून संशयीताला पळवून लावण्याचा प्रयत्न या टोळक्याने केला होता.

नवीन कायद्यानुसार कारवाई
या हल्ल्यात पोलिस शुभम जोशी यांच्यासह इतर कर्मचारी जखमी झाले आहेत. शुभम जोशी यांच्या फिर्यादीवरून 16 जानेवारी रोजी पहाटे बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नवीन भारतीय न्याय संहिता च्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. यात कलम 132 लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर करणे, कलम 121 लोकसेवकाला गंभीर दुखापत पोहचवणे, कलम 189 बेकायदेशीर जमाव जमवणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

परिसरात तणावपूर्ण शांतता
या घटनेनंतर मुस्लीम कॉलनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे स्वतः या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. पसार संशयीतांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली डीवायएसपी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट दिली, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी जात परिसरात संशयीतांचा शोध घेतला.

या संशयीतांविरोधात गुन्हा
पोलिसांनी जैनु (पूर्ण नाव माहिती नाही), बाबरची मुलगी, मिंजु जुलफेाकार अली बाबर उर्फ श्री इराणीची पत्नी, नाजमा तालीब, तालीबची बहीण उसनारा, मरीयन जाफर इराणी, मतारी करार अली, सुकीना हसनैन अली, नजीया टिप्पू शेख उंद्री, कनिजा हुजूर अली उर्फ चेरी, कुमेल अब्बास जुलफोकार अली, करारअली हुजूर अली तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक (सर्व रा. भुसावळ) व इराणी महिला व पुरूष यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वॉण्टेड आरोपीला बेड्या
पोलिस प्रशासनावर अशा प्रकारे हल्ला करणे अत्यंत गंभीर आहे. सरकारी कामात अडथळा आणणार्‍या आणि पोलिसांवर हात उचलणार्‍या एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. आरोपींची ओळख पटली असून लवकरच सर्वांना अटक केली जाईल. पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना पाहिजे असलेल्या संशयीताला अटक करून मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !