भुसावळातील बियाणी स्कूल व जुनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात


भुसावळ (17 जानेवारी 2006) : भुसावळ शहरातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंम्मेलन शुक्रवार, 16 रोजी झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी होत्या.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औष्णिक विद्यूत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे उपस्थित होत्या. यावेळी विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी, अखिल भारतीय पारीक समाज म.रा.उपाध्यक्ष राजेश पारीक, प्रवीण भराडिया, जळगाव जिल्हा आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष गोपाळ ठाकूर, बी.एड.कॉलेजच्या प्राचार्य कंचन जोशी, डी.एम.पाटील, आकाश इंगळे, सुशील नारखेडे, रुद्रसेन गंठिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनीनी उत्तमरीत्या शिवतांडव, शिवराज्याभिषेक सोहळा, साउथ इंडियन डान्स, राजस्थानी डान्स तसेच विविध नृत्यांचे सादरी करण केले.

प्रसंगी राजेश मोराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रजनी सावकारे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सूत्रसंचलन अलिना खान तर आभार प्रिंसीपल रुद्रसेन गंठीया यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !