भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
Farewell to 10th grade students at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (17 जानेवारी 2006) : भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी निरोप देण्यात आला. यावेळी स्कूलच्या प्रिंसीपल निना कटलर, व्हाईस प्रिंसीपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, हर्षला चौधरी, रितू प्रभूदेसाई, वर्षा काळे, प्रतिभा काकडे, शेख कय्युम आदी उपस्थित होते.
शाळेसह गावाचे नाव उज्वल करा
प्राचार्य निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी महिन्यात परीक्षा असल्याने चांगला अभ्यास करा. सकाळी लवकर उठून अभ्यास केल्याने लक्षात राहत असल्याने पहाटेच्या वेळी अधिक अभ्यास करा. तुम्ही जास्तीत जास्त मार्कस मिळवून उतीर्ण होऊन शाळेचे व परिवाराचे नाव उज्ज्वल करा. यावेळी त्यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी एकमेकांना आगळा वेगळा पद्धतीन दिला निरोप
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पांढर्या रंगाचे शर्ट घालून त्यावर सर्व मित्र मैत्रिणींच्या तसेच शिक्षकांच्या स्वाक्षर्या करुण तसेच मैत्रीचा संदेश लिहून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निरोप दिला.
शाळेचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी मित्रमंडळी एकमेकांपासून दूर जातील म्हणून त्यांच्या चेहर्यावर नाराजी दिसून येत होती.विद्यार्थ्यांनी देखील एकमेकांना शुभेच्छा देऊन निरोप दिला. सूत्रसंचलन सोफीया पीबॉडी यांनी तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.

