भुसावळातील खडका चौफुली उड्डाणपुलाखाली अनोळखीचा मृतदेह आढळला
The body of an unidentified person was found under the Khadka Chowk flyover in Bhusawal भुसावळ (18 जानेवारी 2026) : राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीजवळील उड्डाणपुलाखाली बुधवार, 15 रोली दुपारी सुमारे 1.45 वाजेच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
शहरातील मिल्लत नगरातील रहिवासी शेख युनुस शेख गफुर (54) हे हिरा हॉलकडे जात असताना उड्डाणपुलाखाली गर्दी दिसल्याने तेथे जाऊन पाहणी केली असता एक अनोळखी पुरुष कोणतीही हालचाल न करता जमिनीवर पडलेला दिसून आला. त्यास आवाज दिला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्याचा श्वासोच्छ्वास बंद असून शरीर थंड पडलेले असल्याने सदर व्यक्ती मृत्यू झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहे, अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


