भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी धावणार
भुसावळ (18 जानेवारी 2026) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भुसावळ ते मिरज अनारक्षित विशेष गाडी (दोन फेरी)
गाडी क्रमांक 01209 विशेष दिनांक 23 जानेवारीला भुसावळ येथून 16.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी मिरज येथे 08.50 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01210 विशेष दिनांक 26 जानेवारीला मिरज येथून सात वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी भुसावळ येथे 12.30 वाजता पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

अमरावती ते पनवेल अनारक्षित विशेष गाडी (दोन फेरी)
गाडी क्रमांक 01416 विशेष गाडी 22 रोजी अमरावती येथून 12 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पनवेल येथे चार वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01415 विशेष दिनांक 26 रोजी पनवेल येथून 7.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी अमरावती येथे 12 वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जतला थांबा असेल. या गाडीला 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

