भुसावळातील मुख्य मार्गावर शौचालयांची व्हावी उभारणी : रिपब्लिकन सेनेचे नगराध्यक्षांना निवेदन


भुसावळ (18 जानेवारी 2026) : भुसावळ शहराच्या मुख्य मार्गावर, बस स्थानक ते साईबाबा मंदिरापर्यंत एकही सार्वजनिक मुतारी (शौचालय) नगरपालिकेने बनवलेले नाही, ज्यामुळे शहरवासीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या महिलांसह वयोवृद्धांची कुचंबणा होत असल्याने रिपलब्लिन सेनेने या संदर्भात दखल घेण्याची मागणी करीत लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व पालिका प्रशासन निवेदन दिले.

अशी आहे मागणी
भुसावळ बस स्थानकापासून ते साईबाबा मंदिरापर्यंत – मुख्य मार्गावर मुतारी (शौचालय) नसल्यामुळे भुसावळ शहरवासीयांना सार्वजनिक स्थळांवर शौचास जावे लागते, ज्यामुळे शहराची स्वच्छता आणि स्वास्थ्य खराब होते. या मार्गावर लवकरात लवकर मुतारी (शौचालय) तयार करावे शिवाय मुतारी नसल्यामुळे विशेषतः महिला, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना खूप अडचणी येत आहेत.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणी, दिनेश इखारे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे (मेजर), देवदत्त मकासरे (मेजर), प्रमोद बावस्कर, बंटी नरवाडे, सुनंदा मोरे, कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, राजश्री सोनवणे, वर्षा सपकाळे, मयूर नरवाडे, आदित्य तायडे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !