उमाळा फाट्यावर दुचाकीला बसची धडक : भुसावळ तालुक्यातील वयोवृद्ध ठार


Motorcycle hit by a bus at Umala junction : Elderly man from Bhusawal taluka killed जळगाव (18 जानेवारी 2026) : जळगाव-भुसावळ महामार्गावरील कंडारी फाटा (उमाळा) जवळ भरधाव बसने दुचाकीला उडवल्याने या अपघातात 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. प्रल्हाद अमृत बाविस्कर (60, रा.मन्यारखेडा, ता.भुसावळ) असे मृताच तर सुनीताबाई प्रल्हाद बाविस्कर (52) असे जखमीचे नाव आहे.

असा घडला अपघात ?
बाविस्कर हे पत्नीसोबत दुचाकीने (एम.एच. 19 ई.डी. 9339) ने उमाळा फाट्याकडून मण्यारखेड्याकडे जात असताना दुपारी 4.40 वाजेच्या सुमारास पाठीमागून येणार्‍या बसने (एम.एच.19-7401) ने बाविस्कर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील प्रल्हाद बाविस्कर हे उडून जळगावकडून येणार्‍या एका कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आले. कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नी अपघातात गंभीर
या अपघातात प्रल्हाद बाविस्कर यांच्या पत्नी सुनीताबाई या देखील रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ बाबुराव नामदेव बाविस्कर (67) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर बस चालक सचिन भारत बागुल (41, रा.रावेर) याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास हवालदार हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !