!-- afp header code starts here -->

भुसावळातील हवालदार सुरज पाटील यांचा ‘कर्तबगार उत्कृष्ठ पोलीस’ राज्य पुरस्काराने सन्मान


रावेर (20 जानेवारी 2026) : सराईत गुन्हेगारांना देशभरातील कानाकोपर्‍यातून अटक करण्यासह विविध गुन्ह्यांचे प्रगटीकरण करणार्‍या भुसावळ पोलिस दलातील हवालदार सुरज पाटील यांचा रावेरच्या मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालय व ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजसेवक व सावित्रीबाई फुले फातिमा शेख पुरस्कार सोहळ्यात कर्तबगार उत्कृष्ट पोलीस राज्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कर्जोद, ता.रावेर येथे पुरस्काराने गौरव
जळगावच्या ईकरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष करीम सालार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जोद, ता.रावेर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात  समाजातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या समाजसेवींचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा तसेच शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
उद्घाटक डॉ.संदीप पाटील होते. कार्यक्रमाचे आयोजन मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयाचे अध्यक्ष शे.शकील अब्दुल यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, नगरसेवक पद्माकर महाजन, अ‍ॅड.एस.एस.सैय्यद, शेतकरी नेते दिलीप कांबळे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस वासुदेव नरवाडे, राजीव सवर्णे, सी.एस.पाटील, दीपक नगरे, गयासोद्दीन काझी, डी.डी.वाणी आदींची उपस्थिती होती.

भुसावळातील हवालदार सुरज पाटील यांचा सन्मान
गौरव सोहळ्यात भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील हवालदार सुरज पाटील यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हवालदार. सुरज पाटील यांनी अनेक गुन्ह्यांची उकल कर्‍यासह अनेक सराईत गुन्हेगारांना देशभरातून गुन्ह्यांच्या तपास कामी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना गौरवण्यात आले. पाटील यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !