भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात ‘साडी डे’ उत्साहात
भुसावळ (20 जानेवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात ‘साडी डे’ चे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते विद्यार्थिनींना फोल्डरचे वाटप करण्यात आले.
साडी म्हणजे संस्कृतीशी जवळीक
प्राचार्यानी सांगितले की, साडी परिधान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीशी आपली जवळीक असणे हे आहे, आपण संस्कृतीच्या चौकटीत रहातो हे खुप अभिमानाचे आहे. असेच संस्कृतीचे पालन करा पण त्याला अभ्यासाची जोड दिली तर प्रगती निश्चित होते व आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटतो तसेच सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी मुलींना कॉलेजमध्ये शिक्षणाचे वाण,घ री आई-वडीलांकडून संस्कारांचे व संस्कृतीचे वाण मिळत असते ते जतन करा व संक्रांतीला वाण का दिले जाते व त्याचे महत्व काय आहे याबाबत माहिती दिली.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.उत्कर्षा पाटील, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.







