!-- afp header code starts here -->

लेवा पाटीदार महासंघाकडून पूनम फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान : मोहन फालक


भुसावळ (20 जानेवारी 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या ऊपशिक्षीका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहु महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली आहे. त्यांना थोपटे लॉन्स, रहाटणी, पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे ‘कर्तृत्ववान महिला’ हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक नामदेव दादा ढाके व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डी.जी.पी.डॉ.सुहास वारके, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ.केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष, एल एम सी ग्रुप चे अध्यक्ष मिलिंद चौधरी, तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक, भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संखेने समाज बांधव व महिला ऊपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर अ‍ॅड.जयश्री पाचपांडे, दीपक पाचपांडे, समाजसेवी खुशबू फिरके,च ंदन फिरके आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

कुर्‍हेपानाचे येथेही गौरव
पूमम फालक यांनी पुरस्कार मिळवल्यानंतर कुर्‍हेपानाचे येथील जयलक्ष्मी अ‍ॅकेडमीत अभिनंदन समारोह झाला. हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसुन फालक परिवाराचा अभिमान असून पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे व कार्य तप्तरतेचे, चिकाटीचे, कार्यक्षमतेचे द्योतक आहे. यामुळे परीवाराला,समाजाला प्रेरणा मिळते. मला नमूद करावेसे वाटते क,ी मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांक्रांत करून संस्थेचे, विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्वल करावे. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे कष्टाचे प्रयत्नाचे व संसार रुपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या व आदर्श निर्माण करणार्‍या आदर्श व्यक्तीचा सत्कार करतांना आम्हाला धन्यता वाटत आहे व यांचाच आम्हाला अभिमान आहे, असे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमुद केले.

तर कोणतेही यश अवघड नाही
श्री.दे.ना.भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, जर नारी ही ठामपणे आपल्या कर्तृत्वावर व केलेल्या कार्यावर विश्वासाने उभी राहिली तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. आज त्यांचे अभिनंदन करताना आम्ही स्वतःला गौरवास्पद समजत आहोत. त्या शिक्षण क्षेत्रात अत्युत्तम भरारी घेतील असा आशावाद त्यांनी प्रकट केला. चेअरमन महेश फालक यांनी सुध्दा आपल्या भाषणातुन शुभेच्छा दिल्यात.

यांची होती उपस्थिती
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, ताप्ती पब्लिक स्कुलचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, फालक परीवाराचे सर्व सदस्य,नातेवाईक व मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत विजय फालक, गोकुळ फालक, जयराज फालक, माधुरी फालक यांनी केले. सूत्रसंचालन लावण्या फालक यांनी तर आभार जयंत फालक यांनी मानले. उपस्थितांनी पूनम फालक यांचा सत्कार केला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !