अट्रावलच्या मुंजोबा यात्रेला उत्साहात सुरवात
यावल (20 जानेवारी 2026) : राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान व जागृत देवस्थान असलेल्या अट्रावल, ता.यावल येथील मुंजोबाच्या यात्रोत्सवाला सोमवार, 19 पासून सुरवात झाली. आगामी शनिवारी, सोमवार अशा चार प्रमुख वारानंतर 1 फेब्रुवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचा समारोप होईल. पहिल्याच दिवशी देवस्थानावर मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी उसळली.
उत्साहात झाली यात्रोत्सवाला सुरूवात
यावल तालुक्यातील अट्रावल येथे सालाबादा प्रमाणे सोमवार पासुन मुंजोबा यात्रेस मोठ्या उत्साहात सुरवात झाली. मुंजोबांचे जागृत देवस्थान म्हणून अट्रावल प्रसिध्द आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येत येथे भाविक दर्शनार्थ येतात. नवस फेडण्याकरीता देखील गर्दी होेते. पहिल्या यात्रेच्या ‘वार’ ला हजारोंच्या संख्येत भाविकांनी उपस्थिती दिली.

यावल आगारातून बस सेवा
भाविकांना यावल, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर आदी एस.टी.आगारातून यात्रा विशेष बससेवादेखील उपलब्ध करण्यात आली. यावल आगाराकडून अट्रावलसाठी नियमित दर 20 मिनंटांनी एक बस असे नियोजन करण्यात आले. यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळेसह जिल्ह्यास्तरावरून देखील विशेष पोलिस व वाहतूक पोलिस कर्मचारी बंदोबस्ताकरीता तैनात होते. भाविकांच्या सेवेकरीता मंदिर संस्थानकडून देखील स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. यापुढील यात्रेचेे वार शनिवार, 24 जानेवारी, सोमवार, 26 जानेवारी व सोेमवार 31 जानेवारी असे मुख्य चार वार असून फेब्रुवारी पौर्णिमेला यात्रेचा समारोप होईल.







