भुसावळातील सोनिच्छा ड्रॉईंगचा शासकीय चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल
Sonichha Drawing Institute in Bhusawal achieved a 100 percent result in the government drawing examination भुसावळ (21 जानेवारी 2026) : कला शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणार्या एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट शासकीय रेखाकला परीक्षा 2025 चा निकाल जाहीर झाला. यात भुसावळ येथील सोनिच्छा ड्रॉईंगने एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट दोघेही परीक्षांच्या शंभर टक्के निकालाची आणि सर्व विद्यार्थी सर्वोच्च ग्रेड मध्ये उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवली.
सर्व विद्यार्थी उत्तीर्ण
एलिमेंटरी परिक्षेत 10 पैकी 8 विद्यार्थी ए ग्रेड, 2 विद्यार्थी बी ग्रेड मध्ये तर इंटरमिजीएट परीक्षेतील 17 पैकी 15 विद्यार्थी अ ग्रेड आणि बी ग्रेड मध्ये दोन असे सर्वच विद्यार्थी सर्वोच्च ग्रेडने उत्तीर्ण झाले.

उत्कृष्ट निकालात बाबतीत विद्यार्थ्यांनी सांगितले की, शिक्षिका जयश्री चौधरी यांनी आमच्याकडून स्केचिंग, सुक्ष्म बारकावे, अचुक रंगकामासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचा सराव करून घेण्यावर भर देत असल्याचे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही यशस्वी झाल्याचे सांगितले.
एलिमेंटरी परीक्षेत यांनी मिळवले यश
आकाश दांडगे, स्वरा राणे, खुशी महाजन, जान्हवी भंगाळे, दुर्गा फालक, रोहित पाटील, शरद फेगडे, देवांश बडगे यांना ए ग्रेड तर अर्णव पाटील, प्रसाद चोपडे यांना बी ग्रेड मिळाली.
इंटरमिजीएट परीक्षेत यांनी मिळवले यश
सुनिधी सावकारे, ओम पालक, तन्मय पाटील, खिलेश फिरकले, अनन्या भुसे, ओम खांडेकर, खुशबू सपकाळे, गौरव तायडे, रिया तायडे, सोनाक्षी पाटील, हेतल महाजनी, गार्गी वानखेडे, मनस्वी नागोरी, प्रेम जावळे, उत्कर्ष सुशिल ए ग्रेड तर निरुपमा सनांसे, श्रेया टेकाडे बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.







