यावल नगरपरिषदेच्या विषय समित्यांची ईश्वर चिठ्ठीव्दारे निवड
सहापैकी चार समित्या उबाठा गटाकडे
The subject committees of the Yawal Municipal Council were selected through a lottery system यावल (21 जानेवारी 2026) : यावल नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवड सोमवारी झाली. दोन समित्यांवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदसिध्द सभापती तर भाजपा व काँग्रेस यांच्या संख्याबळानुसार प्रत्येकी दोन दोन समित्यांवर ईश्वर चिठ्ठीव्दारे निवड झाली. यात भाजपाच्या वतीने दोन समितींचे सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना देण्यात आले तर काँग्रेसनेदेखील दोन्ही सभापतीपद अपक्षांना बहाल केले. सहा पैकी चार समित्या उबाठाकडे गेल्या.
विषय समित्यांची निवड
नगरपरिषदेच्या सभागृहात 19 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या तर सहाय्यक म्हणुन मुख्याधिकारी निशीकांत गवई आणि सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे यांनी कामकाज पाहिले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांची स्थायी समिती सभापतीपदी पदसिध्द सभापती म्हणून तर उपनगराध्यक्षा सईदाबी मो. याकुब शेख यांची स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली.




इतर चार समितीमध्ये भाजपा व काँग्रेसच्या प्रत्येकी आठ या सारख्या संख्येनुसार चार ही समितीत सारखे संख्याबळ पाहता चार समित्यांमध्ये दोन्हींना इश्वर चिठ्ठीतून समितीचे सभापती पद देण्यात आले. यात शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती व पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती काँग्रेसकडे तर बांधकाम नियोजन व विकास समिती व महिला व बालकल्याण समिती भाजपाकडे गेली तर भाजपाने दोन्ही समितीचे सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटास दिले आहे.
असे आहेत समिती व सभापती
स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्षा छाया अतुल पाटील
स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती- पदसिध्द उपनगराध्यक्षा सईदा बी.शेख
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती अपक्ष इमाम खान समीर खान
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती अपक्ष पराग विजय सराफ
बांधकाम नियोजन व विकास समिती सभापती राष्ट्रवादी (अप) च्या अंजुमबी कदीर खान
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राष्ट्रवादी (अप) च्या अमिनाबी शाकीर खान
राष्ट्रवादी अजित पवार गट किंगमेकर
सभापती च्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटनेत्या वर्षा अकाश चोपडे या किंगमेकर ठरल्या. धार्मिक सलोखा आबादीत ठेवण्यासाठी वर्षां चोपडे यांची समितीमध्ये अर्ज करून भाजपाच्या कोट्यातील दोन्ही सभापती पद मिळवत ते गटातील दोन्ही मुस्लिम नगरसेवकांना दिले. त्यांच्या खेळीत मुस्लिम समाजाला न्याय मिळाल्याचे सर्व स्तरावरून बोलले जात आहे. संख्याबळ असतांना भाजपा मात्र आपल्या हिस्यावर आलेल्या दोन्ही जागेवर आपला एक ही सभापती करू शकले नाही.