खडका गावात बालविवाह मुक्तीची शपथ
An oath was taken in Khadaka village to end child marriage. भुसावळ (27 जानेवारी 2026) : बालविवाह मुक्त भारत आणि जळगाव जिल्हा अभियान तालुक्यातील खडके येथे गणतंत्र दिनाचे औचित्य साधून बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा अभियान अंतर्गत रॅली काढण्यात आली. सामुहिक शपथ घेण्यात आली.
खडके ग्रामपंचायत सरपंच यशोधरा देविदास तायडे व उपसरपंच अर्चना रामसिंग पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत पहिली ते बारावी विद्यार्थी, विद्यार्थिनी गावातील नागरिक मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर इतर मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीतून विविध विषय घेऊन विद्यार्थी घोषणा व इतर सूचना देत होते.
आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर व बाल कल्याण समितीच्या अंतर्गत बालविवाह मुक्त भारत अंतर्गत आधार संस्थेचे संचालक रेणू प्रसाद, अध्यक्ष भारती पाटील प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, सुनील जगन हिवाळे, प्रभात फेरीच्या माध्यमातून पोस्टर माध्यमातून जनजागृती करण्यात आली.







