!-- afp header code starts here -->

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण


The national flag was hoisted at K. Narkhede School in Bhusawal on the occasion of Republic Day भुसावळ (27 जानेवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त सुभेदार कृष्णाजी खडसे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील तसेच शाळेतील व संगणक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एम.व्ही.कुलकर्णी सर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व विद्यार्थ्यांकडून वाचन करवून घेतले.

पी.व्ही.पाटील साहेब यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध कवायत संचलन केले. या कवायत संचालनासाठी नवीन नेमाडे व निलेश नेहेते यांनी विशेष परिश्रम घेतले. डी.एम.हेलोडे सर यांनी तंबाखूमुक्तीची शपथ तर एस.डी.वासकर यांनी कॉपी मुक्तीची शपथ व एस.टी. चौधरी सर यांनी असाक्षरता मुक्तीची शपथ तसेच एस.एस.कापसे यांनी मतदाराची शपथ विद्यार्थ्यांना दिली.

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नव्या युगाचे नव्या दिलाने हे गीत तर शिक्षकांनी ‘जयोस्तुते’ या देशभक्तीपर गीताचे समूह गायन केले. यावेळी संगीत शिक्षक हेलोडे सर व कुलकर्णी यांनी त्यांना साथ संगत दिली.

विद्यार्थ्यांमधून गुंजन चौधरी व प्रिया बोरोले यांनी प्रजासत्ताक दिनाची व संविधानाची माहिती व महती सांगितली. अतिथी कृष्णाजी खडसे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन चेतना खडसे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस.पी. पाठक यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रदीप सपकाळे, शैलेंद्र महाजन, विनोद सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !