भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
भुसावळ (27 जानेवारी 2026) : कोलते फाउंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. अध्यक्ष निशिकांत कोलते, राजश्री कोलते, सी.ए.रोहित कोलते व प्रमुख अतिथी सैनिक प्रतिनिधी विरेंद्र ठाकरे उपस्थित होते. जेसीआय महिला अध्यक्ष हेमा बेहरा, सचिव रेखा व्यास व प्रोजेक्ट चेअरमन उर्वशी भटेजा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली.
अतिथींचे स्वागत मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांनी वंदे मातरम व देशभक्तीवर मनोगत व्यक्त केले. सी.ए. रोहित कोलते यांनी संविधानाचे महत्व सांगितले. अनिरुद्ध गुप्ता, शाम्भवी श्रीवास्तव व दिव्यांश फुलझेले यांनी संविधानावरील विचार मांडले. शौर्या सपकाळे यांनी सैनिकांवरील कविता सादर केली. पूर्व प्राथमिक शिक्षिका भारती पेट्रीक यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान झाला. ग्रीन हाऊस वार्षिक विजेता ठरला. विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमांनी सोहळ्याची शोभा वाढली.








