!-- afp header code starts here -->

भुसावळातील प.क.कोटेचा महिला विद्यालयात ध्वजारोहण


भुसावळ (27 जानेवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेचे सचिव राजेश सुराणा यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य संजय सुराणा, शिरीष नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन धांडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.वसंत खरे, समन्वयक डॉ.जे.व्ही.धनवीज यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेतील सरनाम्याचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !