भुसावळातील देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
भुसावळ (27 जानेवारी 2026) : दि भुसावळ पीपल्स चॅरिटेबल संस्था संचलित दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 7.45 वाजता महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले,
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, भक्तीगीत झाले तसेच व्यसन मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी समाजसेवक प्रवीण भोळे, न्या.संजय बुंधे उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी देशाप्रती निष्ठा व संविधानाचे पालन करण्याची भावना व्यक्त केली.
प्रास्ताविक जिल्हा व्यसनमुक्ती अध्यक्ष प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी तर संचालन शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले. सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सांस्कृतिक समिती सदस्य एनएसएस अधिकार्यांनी परिश्रम घेतले.







