!-- afp header code starts here -->

भुसावळातल पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन


भुसावळ (27 जानेवारी 2026) : कला, विज्ञान आणि पी.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डी.एन.पाटील होते. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर व प्रा.भूपेंद्र बाणाईत उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी मांडली. 25 नोव्हेंबर 1950 राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेचे औचित्य साधून हा दिन साजरा करण्यात येतो. 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी. जात, धर्म,भाषा, प्रदेश निरपेक्ष मतदान झाले पाहिजे यावर प्रकाश टाकला. मतदारांची मतदानाबाबत शपथ घेण्यात आली. आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र नाडेकर यांनी मानले.

उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनी मतदार दिनानिमित्त मतदानाची शपथ घेतली. कार्यक्रमास प्राचार्य प्रा. डॉ.बी.एच. बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ. जी.आर. वाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !