भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
भुसावळ (27 जानेवारी 2026) : शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. विद्यार्थ्यांनी देशासाठी महापुरूषांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपरगीत सादर केले तसेच देशभक्तीवर आधारीत नृत्य सादर केले. ध्वजवंदना प्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, मुख्याध्यापिका अनघा पाटील,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








