!-- afp header code starts here -->

रावेर-यावल तालुक्यात अवकाळीने नुकसान : नुकसानग्रस्त भागांचे पंचनाम्याचे आमदार जावळेंनी दिले आदेश


Unseasonal rains have caused damage in Raver and Yawl talukas: MLA Jawale has ordered that surveys be conducted of the affected areas यावल (28 जानेवारी 2026) : रावेर व यावल तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. जोरदार वादळासह झालेल्या गारांच्या मार्‍यानंतर आलेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच वादळी वार्‍यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पत्रे उडून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तत्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. शेतकर्‍यांच्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी व पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !