यावल शहरात घरफोडी : 70 हजाराचा मुद्देमाल लांबवला
Burglary in Yaval town: Goods worth 70,000 rupees stolen. यावल (28 जानेवारी 2026) : यावल शहरातील फैजपूर रस्त्या लागत असलेल्या विस्तारित भागात विरार नगरात घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले यावल शहरात ?
शहरातील फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागात विरार नगर आहे. या विरार नगरातील रहिवाशी नर्गिस अनिस पटेल यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने अनधिकृतपणे प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल लांबवला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात नर्गिस पटेल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळ करीत आहे.







