भुसावळातील तु.स.झोपे शाळेत उद्या रंगणार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
The artistic talents of students will be showcased tomorrow at T.S. Zope School in Bhusawal. भुसावळ (30 जानेवारी 2026) : शहरातील तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिराचा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, 30 रोजी प्रभाकर हॉलमध्ये होत आहे. अध्यक्षस्थानी डॉ.मकरंद एन.नारखेडे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले, सचिव पी.व्ही.पाटील, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सदस्य विकास पाचपांडे, अर्चना नारखेडे, भाग्येश एम.नारखेडे, संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहतील.
विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुनील वानखेडे यांनी केले आहे.
