भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना आदरांजली
A tribute was paid to the late Deputy Chief Minister Ajitdada Pawar at P.O. Nahata College in Bhusawal भुसावळ (30 जानेवारी 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात विमान अपघातात दुर्दैवीरित्या निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
मौन राखून वाहिली आदरांजली
उपप्राचार्य प्रा.डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे, सचिन पाटील यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शांतीमंत्र म्हणण्यात आला व दोन मिनिट स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान हो यासाठी प्रार्थना करण्यात आलीफ यावेळी उपस्थितांना अजितदादा यांच्या कार्याची थोडक्यात ओळख महाविद्यालयाचे प्रा.भूषण बाणाईत यांनी करून दिली. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.
