भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधींना अभिवादन
Mahatma Gandhi was honored at Tapati Public School in Bhusawal भुसावळ (30 जानेवारी 2026) : शहरताील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रिन्सिपल निना कटलर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रपित्याच्या मार्गावरुन वाटचाल करा
प्रसंगी प्रिन्सिपल निना कटलर यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला. महात्मा गांधी हे एक भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते जे ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते बनले म्हणून त्यांना राष्ट्रपिता हा किताब मिळाला. यावेळी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी देखील महात्मा गांधी यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शेख कयूम यांनी केले.
