भुसावळसह जामनेरातून दुचाकी लांबवणार्या चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक
चोरीच्या तीन दुचाकी जप्त : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Thieves who stole two-wheelers from Bhusawal and Jamner have been arrested by the crime branch भुसावळ (30 जानेवारी 2026) : भुसावळसह जामनेरातून तीन दुचाकी लांबवणार्या जामनेरच्या दोन चोरट्यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनुराग लक्ष्मण सुनगत (19, रा.वाकी रोड, हरी ओमनगर, जामनेर) व दर्शन बाप्पू चव्हाण (18, रा.संत सेवालाल नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चोरीत आरोपींचा एक साथीदार निष्पन्न झाला असून त्याचाही शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींच्या पथकाने केली.
