बॉर्डर 2 चित्रपटात शिवरायांचा उल्लेख सन्मानजनक व्हावा : भुसावळात शिवसेनेचे निवेदन


Shiv Sena submits memorandum in Bhusawal demanding that Chhatrapati Shivaji Maharaj be mentioned respectfully in the film ‘Border 2’. भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : अलीकडेच प्रदर्शित झालेल्या बॉर्डर 2 चित्रपटात अभिनेता सनी देओल याने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केवळ शिवाजी महाराज असा कून समस्त सकल व मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींचा उल्लेख खरे तर सन्मानजनक व्हायला हवा होता मात्र सनी देवोल यांनी केलेल्या उल्लेखाने समाजबांधवांची मने दुखावल्याने देवोल यांनी जाहीरपणे मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देताना करण्यात आली.

यावेळी भुसावळ विभाग प्रमुख अवि भगत यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. शिवसेना संघटक सौरभ पवार, कोळी समाज संघटक राज पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !