!-- afp header code starts here -->

वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रियेतेमुळे थंंडीचे प्रमाण वाढेल

13 अंशापर्यंत पारा घसरण्याची शक्यता, कमाल तापमान स्थिर


भुसावळ (6 फेब्रुवारी 2026) : उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय झाल्यामुळे थंडीचे प्रमाण पुन्हा काही अंशी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र कमाल तापमानात चढ-उतार राहतील. 5 ते 6 फेब्रुवारीपासून किमान तापमानात दोन ते पाच अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते 13 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत येण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान 32 ते 35 डिग्री राहणार
भुसावळसह विभागात कमाल तापमान 32 ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सोबतच पुढील काही दिवस ढगाळ हवामान आणि वार्‍यांचा वेग राहील. वेस्टर्न डिस्टर्व्हसमुळे काही दिवस आकाशात ढगाळ वातावरण राहिल. ज्यामुळे सूर्यप्रकाश कमी होऊन कमाल तापमान घट होऊ शकेल. तर ज्या दिवशी आकाश निरभ्र राहिल, त्या दिवशी कमाल तापमान वाढेल. मात्र किमान तापमानात काही अंशी घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या शहराचे किमान तापमान 19 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे, ते 13 ते 16 अंशांवर होईल. यामुळे वातावरणात बदल होणार आहे.

पावसाची शक्यता नाही
उत्तर-पश्चिमेकडून येणारे वारे दिवसा उष्णता वाढवतात, पण ढगाळपणामुळे ते कमी होतात. बंगालचा उपसागर आणि भारतीय महासागराचा फेब्रुवारीत फारसा प्रभाव पडत नाही, कारण हिवाळ्यात हे क्षेत्र कोरडे राहते आणि त्यांचा प्रभाव मुख्यतः मान्सून काळात असतो. पुढील काही दिवसात ढगाळ वातावरण झाले तरी पावसाची शक्यता
नसल्याचे हवामान अभ्यासक नीलेश गोरे म्हणाले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !