भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
The Science Club was inaugurated at P.O. Nahata College in Bhusawal भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी, रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ.उमेश फेगडे आदी उपस्थित होते.
साहित्य आढावाबाबत मार्गदर्शन
प्रा.डॉ.उमेश फेगडे यांनी साहित्य आढावा आणि प्रकल्प लेखन या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले की, संशोधन प्रकल्प किंवा व्यावसायिक अहवालात ‘साहित्य पुनरावलोकन’ आणि एक उत्तम ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी तर आभार डॉ.प्रा.व्ही.एन.महिरे यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.गौरी पाटील, प्रा.डॉ.एस.डी.येवले, प्रा.डॉ.सचिन कोलते, प्रा.डॉ.नीलिमा पाटील, प्रा.डॉ.पूनम महाजन, प्रा.डॉ.संगीता भिरूड, प्रा.डॉ.अजय क्षिरसागर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.







