भुसावळात बारावी परीक्षेवर आता सीसीटीव्हीची नजर
गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूममधून थेट वर्गांवर लक्ष
In Bhusawal, the 12th-grade examinations are now under CCTV surveillance भुसावळ (8 फेब्रुवारी 2026) : कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न असून त्या दृष्टीने आगामी बारावी परीक्षेत सर्वच परीक्षा केंद्रावरद आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी बारावीची सुरू होत आहे. शहरात सहा तर तालुक्यातील वरणगाव येथे 1 अश्या सात केंद्रावर परीक्षा होईल.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून नियंत्रण
143 खोल्यांमध्ये 3 हजार 631 विद्यार्थी परीक्षा देत असून या सर्व केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असेल तर या सातही परीक्षा केद्रांवर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यांचे कंट्रोल रूम हे येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय असेल. तेथून सातही परीक्षा केद्रांवर कॅमेर्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. यामुळे यंदा कॉपी करतांना कोणी आढळल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे.
कॉपी आढळल्यास दाखल होणार गुन्हे
एचएससी अर्थात बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. शहरात 6 तर वरणगावला एक असे 7 केद्रे आहे. यंदा 3631 विद्यार्थी हे 143 वर्ग खोल्यांमध्ये बसून परीक्षा देणार आहे. बोर्डाने यंदा कॉपीमुक्तसाठी प्रत्येक वर्गात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या आहे. यंदा सातही परीक्षा केद्रांवरील 143 वर्ग खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले आहे, या सर्व कॅमेर्यांचे कंट्रोल रूम हे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात राहणार आहे, तेथून प्रत्येक वर्गावर नजर ठेवली जाणार आहे.
असे असतील विद्यार्थी
शहरातील ज्या शाळांमध्ये परीक्षा होणार आहे, त्यात डीएल हिंदी हायस्कूलमध्ये 450 विद्यार्थी, के.नारखेडे विद्यालयात 300, संत गाडगे महराज हिंदी विद्यालयात 356, बीझेड उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज 408, नहाटा महाविद्यालय 777, बियाणी ज्युनियर कॉलेज 445 आणि महात्मा गांधी विद्यालयात 895 विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
भरारी पथके, बैठे पथके तैनात
बारावीच्या परीक्षेच्या काळात केद्रावर बैठे पथक तैनात केले जाणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी हे पथक केद्रावर ठाण मांडून बसणार आहे, पेपर सुटेल तोपर्यत हे पथक त्याच परीक्षा केद्रावर थांबून राहणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन केले आहे. त्याच पार्श्वभुमीवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना आहे. यात यात पंचायत समिती स्तर, तहसीलदार यांच्या स्तरावर भरारी पथक, बैठे पथक, जिल्हाधिकारी स्तर, शिक्षण विभागा जिल्हास्तरावरील भरारी पथके राहणार आहे.


