गण गण गणात बोतेच्या स्वरात दुमदुमली व्यास नगरी
यावल शहरात मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा
Shri Gajanan Maharaj’s manifestation day was celebrated with great enthusiasm in Yaval city यावल (9 फेब्रुवारी 2026) : रविवारी गण गण गणात बोतेच्या स्वरात व्यास नगरी दुमदुमली होती. शहरात मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला संपुर्ण शहरातुन सवाद्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. पालखीत श्रीच्या पादूकांची शहरातुन मिरवणुक काढत तिचा समारोप विरार नगरातील श्री गजानन महाराज मंदिरात झाला व येथे धार्मिक कार्यक्रम पार पडत भाविक,भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला व रात्री किर्तन संपन्न झाले.
यावल शहरात रविवारी श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह दिसुन आला. पहाटे सहा वाजे पासुन विस्तारित भागात फैजपुर रस्त्यालगत विरार नगर मधील श्री गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. यात सहा वाजता मूर्तीचा अभिषेक अशोक भंडारी, अनिल पाठक, मुकुल जोशी यांच्याहस्ते पार पडले. आरती, सात वाजता श्रेयश बारजीभे, यश महाजन, लोकेश भोई, गौरव गजऋषी, चेतन वाणी या पाच जणांनी सपत्नीक लघु रुद्र याग पार पाडले.
शहरातील नगर पालिकेजवळील श्री रेणुकादेवी मंदिरापासून दीपक सराफ, प्रा.डॉ.हेमंत येवले, अनिता येवले या दाम्पत्याच्या हस्ते श्री गजानन महाराज यांच्या पादुका व पालखीचे पूजन करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या कळशी पथक, लेझीम पथक आदींचा सहभाग होता. ही पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली.
पालखीचा समारोप दुपारी 12 वाजेला श्री गजानन महाराज मंदिरात झाला व मंदिरात श्रीची महाआरती व धार्मिक विधी उमेश सराफ महाराज सह ब्रम्हवृंदानी पार पाडले. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत ठाणे गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक राजु श्रावण जोगी यांच्या आई सुशीलाबाई जोगी यांच्यासह माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, संस्थेचे अध्यक्ष आर.डी.पाटील, नगरसेवक पराग सराफ, नगरसेविका शुभांगी येवले,प्रशांत पाटील सह मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले. व मोठ्या उत्साहात शहरात श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. या संपुर्ण धार्मिक कार्यक्रमा करीता मंदिर संस्थानचे संचालक मंडळ पी. एम. जोशी, अशोक भंडारी, अनिल पाठक, संजय कदम आदींनी परिश्रम घेतले.
असे पार पडले धार्मिक कार्यक्रम
सकाळी 6 वाजता श्री च्या मूर्तीस अभिषेक व आरती करण्यात आले, सकाळी 7 वाजता श्री गणेश याग, 8 वाजता श्री रेणुका देवी मंदिरापासून श्री च्या पादुकांची पालखी मिरवणूक निघाली होती, दुपारी 12 वाजता श्री गणेश याग पूर्णाहूती व महाआरती पार पडली तर दुपारी 12:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले,याच दरम्यान दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत श्री तारकेश्वर भजनी मंडळ यावल यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, सायंकाळी 7 वाजता श्री गजानन महाराजांची आरती, तर रात्री 8 वाजता ह.भ.प. राजेंद्र आंबीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
