भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
Annual prize distribution at K. Narkhede School, Bhusawal भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : शहरातील के. नारखेडे विद्यालयात 9 रोजी विद्यालयातून इयत्तावार व विषयवार प्रथम येणार्या विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गौरवण्यात आले तसेच वर्गवार हस्तलिखित प्रकाशन सोहळा यावेळी झाला.
यांची होती उपस्थिती
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून डाएट जळगावचे अधिव्याख्याते शैलेश पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुमधुर ईशस्तवन व स्वागत गीत सादरीकरण विद्यालयातील संगीतमंचच्या विद्यार्थिनी व संगीत शिक्षक मनोज कुलकर्णी, सुहास चौधरी यांनी करून वातावरण निर्मिती केली. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी केले. शाळेतील उपशिक्षक एस.पी. झांबरे, श्रीश चिपळूणकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांमधील लेखनकला व सर्जनशीलता या गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थी लिखित वर्गवार हस्तलिखित प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला.

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना अधिकाधिक बक्षीसे मिळवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. उपशिक्षका नेहा पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी वाचन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी सातत्य,चिकाटी, अभ्यासूवृत्ती आदीगुणांची जोपासना विद्यार्थ्यांनी करावी हा मोलाचा सल्ला देत गुणवंतांचे कौतुक केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीस का मिळाले, यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाची कारणे काय, तसेच इतर विद्यार्थी बक्षीस मिळवण्यात अपयशी का ठरले या प्रश्नांनी कार्यक्रमाचे अतिथी शैलेश पाटील सरांनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.
यांची होती उपस्थिती
संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य अर्चना नारखेडे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष भागवत पाटील यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेचे पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठक, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालकवृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
नियोजनात एस.डी.वासकर, नितीन पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्वीतेसाठी संदीप पाटील, माधव गरुडे, अविनाश चौधरी, अनिल जटाळे, विलास पाटील, प्रशांत चौधरी, निळकंठ खाचणे, प्रदीप सपकाळे, निलेश नेहेते, सीमा सपकाळे, गोविंदा पाटील, विनोद सोनवणे, शुभांगी पाटील आणि स्मिता झांबरे या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. एस. पी. महाजन सर यांनी सूत्रसंचालन तर पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी आभार मानले.






