!-- afp header code starts here -->

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धा


भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थी यांच्यासाठी जळगाव जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे 19 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे 9 वे वर्ष आहे.

पाच गटात होणार स्पर्धा
वकृत्व स्पर्धा पाच गटात होईल. प्रत्येक गटातील तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येइल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.


विषय आणि गट पुढील प्रमाणे असतील – गट क्रमांक 1 ( इयत्ता 1ली व 2री) वेळ 2 मिनिट अ) छत्रपती शिवाजी महाराज, गट क्रमांक 2 ( इयत्ता 3री व 4थी) वेळ 3 मिनिट अ) छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण ब) छत्रपती शिवाजी महाराज यांची गुणवैशिष्ट्ये, गट क्रमांक 3 (इयत्ता 5वी ते 7वी) वेळ 4 मिनिट, अ) गड किल्ले-शिवशाहीचे सामर्थ्य, ब) छत्रपती शिवाजी महाराज- स्वराज्याचा सूर्योदय, गट क्रमांक 4 (इयत्ता 8वी ते 10वी)वेळ 5 मिनिट, अ) छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय ब) शिवशाहीतील लोकशाही तत्व, गट क्रमांक 5 (खुलागट)वेळ 7 मिनिट, अ) छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी क्षेत्रातील कार्य, ब) जाणता राजा- छत्रपती शिवाजी महाराज

स्पर्धा गुरवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कुल, नहाटा कॉलेज शेजारी, जामनेर रोड येथे होणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहिती साठी प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे – 9850145399, प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन- 9423476837, सह समन्वयक विक्रांत चौधरी 75888153375 यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेमध्ये नावनोंदणीची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. स्पर्धेच्या दोन फेर्‍या असतील. प्रथम फेरी झाल्यानंतर त्यातून प्रत्येक गटातून 10 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दुसरी फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ 1 मार्च रोजी नहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल, येथे घेतला जाणार आहे. यावेळी निवड झालेल्या स्पर्धकाला पुन्हा तोच विषय सादर करावा लागेल. त्यातून अंतिम निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.

यांचा उपक्रम समितीत समावेश
उपक्रम समितीत डॉ. संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, डॉ. संजू भटकर, ज्ञानेश्वर घुले, प्रसन्ना बोरोले, अमितकुमार पाटील, समाधान जाधव, भूषण झोपे, अमित चौधरी, डॉ.प्रा.श्यामकुमार दुसाने, चंद्रकांत सूर्यवंशी, हितेंद्र नेमाडे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे ,ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, कपिल धांडे, शिरीष कोल्हे, केतन महाजन, उमेश फिरके, मंगेश भावे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, योगेश साळुंके, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !