भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सुद़ृढ आरोग्याच्या टीप्स
Tips for good health for students at N.K. Narkhede English School in Bhusawal भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना डॉ.महेश चौधरी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींना डॉ.मनिषा इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
वाढत्या वयातील बदलांवर मार्गदर्शन
यावेळी वैद्यकिय मार्गदर्शनात विद्याार्थ्यांना येणार्या शारीरीक अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.मनिषा इंगळे आणि डॉ. महेश चौधरी यांनी वयात येणार्या विद्यार्थ्यांना शरीरात होणारे बदल, गुड टच, बॅड टचबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव पी.व्ही. पाटील, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या







