!-- afp header code starts here -->

भुसावळ यार्डातील आरपीएफच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

डॉग स्क्वॉडचे निरीक्षण ; चार ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ मोटारसायकलींना हिरवा झेंडा


Inauguration of the new RPF building in Bhusawal yard भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : रेल्वे सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी भुसावळ यार्ड येथील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ठाण्याच्या नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन 12 रोजी झाले. प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त विवेक सागर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डीआरएम भुसावळ पुनीत अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुटसुटीत कामकाज होणार
नव्या इमारतीमुळे आरपीएफ ठाण्याचे कामकाज अधिक सुटसुटीत व कार्यक्षम होणार आहे. यार्ड परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला गती मिळणार आहे. भुसावळ हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे जंक्शन असल्याने येथे सुरक्षा व्यवस्था सक्षम असणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने आधूनिक सुविधांनी सुसज्ज अशा या इमारतीचे विशेष महत्त्व आहे.


उद्घाटनानंतर प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांनी आरपीएफ डॉग स्क्वॉडला भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या उपस्थितीत डॉग स्क्वॉडचे सविस्तर निरीक्षण करण्यात आले. स्फोटक शोध, गुन्हे प्रतिबंध व विशेष मोहिमांमध्ये डॉग स्क्वॉडची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
याच कार्यक्रमादरम्यान चार नवीन ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ मोटारसायकलींना संयुक्तरित्या हिरवा झेंडा दाखवून फ्लॅग ऑफ करण्यात आले. या मोटारसायकलींच्या माध्यमातून यार्ड व रेल्वे परिसरात गस्त अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर तातडीने नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे.

कार्यक्रमास रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नव्या इमारतीमुळे आणि आधुनिक साधनसामग्रीच्या उपलब्धतेमुळे भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षेला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !